अकोला : बाळापूरचे सहायक गटविकास अधिकारी बंडू पजई यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासन चांगलेच मेहेरबान झाले आहे. जिल्ह्यात आदर्श गटविकास अधिकारी कार्यरत असल्यावरही पजई यांच्याकडे पातूरचा अतिरिक्त प्रभार दिला आहे. दरम्यान प्रशासनाच्या या मेहेरबानीवर आश्चर्य व्यक्त होत असून, पजई यांनीच प्रभारकरिता वरिष्ठांशी जवळीक साधली. चिरीमिरी देऊन पातूरचा अतिरिक्त प्रभार घेतला,अशी चर्चाही आता वर्तुळात रंगत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये प्रभार काढणे व देणे ही बाब नवीन नाही. परंतु पजई यांच्या प्रभारात कुठे तरी पाणी मुरले असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यांनाच हा प्रभार का, असा प्रश्न वर्तुळात उठत आहे.
अकोला जिल्हा परिषदमध्य अनेक गटविकास अधिकारी आदर्श आहेत. परंतु त्यांना प्रभार न देता पजई यांना प्रभार देण्याचे कारण काय, त्यांच्यावरच एवढी मेहरबानी का, हा विषय चर्चिला जात असून, यामध्ये हात ओले करणारे ते वरिष्ठ कोण,असा सवाल केला जात आहे
सहाय्यक गट विकास अधिकारी बंडू पजई यांच्यावर प्रशासन मेहेरबान
