Join WhatsApp group

कापशी रोड येथे उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा उत्साहात पार 🐂✨

कापशी रोड येथे ग्रामीण संस्कृतीचा झगमगाट अनुभवास आला.वार्ताहर मंगेश चराटे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा मोठ्या उत्साहात व पारंपरिक दिमाखात संपन्न झाली. शेतकरी बांधवांनी सजवून आणलेल्या बैलजोड्यांचे आकर्षक प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

स्पर्धेत एकूण सहा विजेत्यांची निवड करून त्यांना बक्षीस ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
🏆 प्रथम: सुरज अमृतलाल केवट
🥈 द्वितीय: अमोल यादव
🥉 तृतीय: रवी केवट
4️⃣ चतुर्थ: दीपक यादव
5️⃣ पंचम: विशाल जाधव
6️⃣ षष्ठ: श्रीकृष्ण वडतकार

बक्षीस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील थोरात व सुवर्णकार अभिजीत वखारकर गजानन पाकदुने यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. शंकरराव सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय केवट यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय बजरंग मंडळ, शिवभक्त मंडळ व भारत माता क्रांती आश्रम ट्रस्ट, कापशी रोड यांचे विशेष योगदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *