अकोला : बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये रविकांत पवार गटविकास अधिकारी पदावर रुजू झाल्यापासून जिल्हा परिषदमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीत अनेक कामात अनियमितता केल्याचा आरोप व शासनाच्या तिजोरीवर नियोजितपणे एक प्रकारे दरोडाच टाकल्याचे समोर येत आहे. याबाबत शासन, प्रशासनाकडे तक्रारी झाल्या असून, पवार यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गेल्या मार्च महिन्यात अनेक कामाच्या निविदा प्रक्रिया न राबविता, विनाकोटेशन करतातच कुठलेही कोटेशन न बोलवता कामे पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवले. त्याची देयके काढून
लाखो रुपयाची अनियमिता केल्याचा आरोप तक्रातीतून केला आहे. या प्रकारावर पांघरुण घालण्यासाठी पंचायत समितीतील त्यांनी नेमलेला एक हस्तक जिल्हा परिषदेच्या एक वरिष्ठ अधिकार्याला त्यातील रसद देऊन त्यांची पाठराखण करीत असल्याचे पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. तर 14 ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मनमानी पद्धतीने आपल्या मर्जीतील मतदारसंघांकडे वळवून अपहार केल्याचा गंभीर आरोप सर्वपक्षीय नऊ पंचायत समिती सदस्यांनी केला आहे.
यासंदर्भातील तक्रार १४ ऑगस्ट रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री ना. आकाश फुंडकर, अमरावतीचे आयुक्त, जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेश्राम यांच्याकडे करण्यात आली आहे. तक्रारदारांनी या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी
करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
४ मार्च २०२४ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत २०२४-२५ सालचा पंचायत समिती विकास आराखडा सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. नियमानुसार सर्व सदस्यांच्या गणातील कामांना निधीचे समसमान वाटप करणे
बंधनकारक असताना, गटविकास अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी दोन गणांना अतिरिक्त निधी देऊन उर्वरित सदस्यांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, मंजूर झालेली विकासकामे प्रत्यक्षात झालीच नाहीत,असा आरोप केला आहे. सभेचे सूचक रोहिदास राठोड यांना या कामांबाबत कोणतीच माहिती
नसल्याचे समोर आले आहे. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे.
रोहिदास राठोड, दादाराव पवार, रामदास गाडगे, बेबीताई जनार्दन गायकवाड, संगीता मनोज जाधव, प्रकाश वाहूरवाघ, मनीषा संतोष लोखंडे, प्रणिता प्रणिता दिनेश मानकर व जावेदखा हमीदखा यांनी ही तक्रार केली आहे.
बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याची मोनोपल्ली
Oplus_16777216
