Join WhatsApp group

जिल्हा परिषद मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अकोला: 79 वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार, कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सलामी देण्यात आली . राष्ट्रगीता नंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मलकापूर च्या स्काऊट गाईड पथकाने पथसंचलन करीत उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. महाराष्ट्र माध्यमिक शाळा अकोला च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. सोबतच स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय स्तरावरील “सुवर्ण तीर” या पुरस्कार प्राप्त अक्षरा सम्राट कांबळे व सृष्टी मंगेश नरवाडे या विद्यार्थिनींचा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल सुरे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी शिक्षण अरविंद जाधव, शिक्षिका शालिनी तायडे, सहाय्यक शिक्षक अब्दुल अबीद, लिपिक धनराज वानखडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *