अकोला : विविध तक्रारीवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समित्या निरर्थक असल्याचे समोर येत आहे. तक्रारीवर केलेल्या चौकशी नंतरही कारवाई होत नसल्याने या समित्यांचीच चौकशी करण्याची वेळ आली आहे.
जि.प.आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्या तसे सर्वच विभाग व उपविभागात काही ना काही भ्रष्टाचारांची तसेच अनियमततेची बरीच प्रकरणे असतात.व त्या साऱ्याच प्रकरणांच्या चौकशीची कामे ही मु.का.अ. कडून चौकशी समिती नेमून त्या चौकशया समित्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश सुध्दा देण्यात येतात. त्या प्रमाणे वरिष्टाचे आदेश म्हणून त्या त्या चौकशा समित्या आपला कामकाजाचा वेळ व्यर्थ घालून संबंधीत कामांची विभागाची चौकशी करून वरिष्ठांना आपला सविस्तर चौकशी अहवाल सुध्दा सादर करतात मात्र त्याच चौकशी अहवालास बगल देण्याचे कामही काही हितसंबंध दडलेले असल्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. आणि म्हणूनच असे वाटते की जर वरिष्ठांनी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ज्या चौकशा समित्या नियुक्त केलेल्या असतात म्हणजेच पर्याने त्या चौकशा समित्या म्हणजेच अधिकारी किंवा मु.का.अ.यांनीच केलेल्या चौकशा असे समजावयास हरकत नाही, मात्र चित्र जे पहावयास मिळते ते फारच निराळे. अशा चौकशी समित्यांचे अहवालस पूर्ण पणे बगल देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.तर मग प्रश्न हा उठतो कि वरिष्ठांना जर त्या चौकशी अहवालावर कार्यवाही करावयाची नव्हती तर मग त्यांनी त्या नियुक्त केलेल्या चौकशा समितीचा अत्यंत महत्वाचा काम-काजाचा वेळ विनाकारण व व्यर्थ का घालवला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तर कारवाई न करण्यामागे वरिष्ठांचे हितसंबंध दडलेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच चौकशी समित्यांच्या अहवालाला गुंडाळून ठेवले जाते, असे आरोपही होत आहेत. अशी कितीतरी अकोला जि.प. मधे उदाहरणे असली तरी कारवाई शून्य असल्याने या समित्या कशासाठी स्थापन केल्या जातात, असाही प्रश्न वर्तुळात उपस्थित केला जात आह
चौकशी समित्यांचीच चौकशी करण्याची वेळ चौकशीवर कारवाईच होत नाही
Oplus_16777216
