अकोला
जानोरकर मंगल कार्यालय येथे आस्था योग फाऊंडेशन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांचे विद्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निलपवार यांच्या प्रेरणेने चंद्रकांत अवचार विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली, उल्हास मोकळकर यांचे पुढाकाराणे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती योग वर्गात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनोदभाऊ मापारी नगरसेवक, सौ.सोनालीताई गणेशराव अंधारे,सौ योगिताताई गणेश पावसाळे, सौ चंदाताई शर्मा, गणेश अंधारे, धनंजय धबाले, ह.भ.प. मनोहर महाराज डुकरे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ.उल्हास मोकळकर, प्रमोद मुरूमकर,डॉ.रमेश नाकट,सुभाष तायडे मंचावर उपस्थित होते. कर्यक्रमामध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उल्हास मोकळकर यांनी केले.त्यांनी आस्था योग फाउंडेशन व महाराष्ट्र योग शिक्षक संघाची झालेली सुरुवात, आतापर्यंत केलेले कार्य खेड्यापाड्यात जाऊन योग प्राणायामाचा केलेला प्रचार प्रसार, आजपर्यंत आबालवृद्ध व तरुण-तरुणीना शाळा कॉलेजमध्ये जाऊन केलेले मार्गदर्शन व त्यापासून त्यांना झालेले लाभ याबद्दल प्रकाश टाकला.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनोदजी मापारी यांनी महामानवाला वंदन नमन करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना खूप खूप शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर आस्था योग फाउंडेशन व महाराष्ट्र योग शिक्षण संघ करीत असलेले कार्य हे मी बऱ्याच वर्षापासून पाहत आहे मी त्यांचे सोबत आहो, नाशिक, शेगाव येथील महायोगोत्सव मी जवळून पाहिले आहेत, अतिशय उल्लेखनीय कार्य आहे, कार्य करतांना येणाऱ्या अडीअडचणी त्यांनी लोकप्रिय खासदार अनुप दादा धोत्रे व माझ्याकडे सुद्धा मांडल्या त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत.मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम असताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात त्या अडचणीवर मात करण्याचं काम आपण मंचावरील सर्वजण करूया व त्यांना योगाभवनांची निर्मिती करून देऊया आणि निश्चितपणे आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे त्यांनी आश्वासित केले. गणेश अंधारे यांनी मनोगत व्यक्त करताना योगा आणि प्राणायाम हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे व प्रत्येकाने तो करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही करीत असलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे व या कार्यासाठी तन-मन-धनाने आम्हीआपल्या सोबत आहोत,श्री धंनजयजी धबाले यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात व मंचावरील नगरसेवक नगरसेविका तुमच्या सोबत आहोत निश्चित तुमचं हे कार्य पूर्णत्वास नेऊ असे आश्वासित केले,त्याचबरोबर योगिताताई पावसाळे यांनी कार्यक्रमास येऊन मला खूप आनंद होतोय योगसाधना खुप महत्वाची आहे म्हणुन योगाचे बरेच कार्यक्रमात मी सहभागी असते मला सुद्धा येऊन आनंद होतो, आमच्याकडून सुद्धा निश्चितपणे आपल्या सेवाकार्याला मदत करणार यात तीळ मात्र शंका नाही.त्याचबरोबर स्वीकृत नगरसेविका चंदाताई शर्मा यांनी सुद्धा वर्गाला खूप खूप शुभेच्छा दिल्यात व या समाज उपयोगी कार्यासाठी माझ्याकडून सुद्धा भरीव मदत देण्याचे कार्य मी करणार आहे हे तुमचे कार्य असेच पुढे वाढत जावो अशा त्यांनी शुभेच्छा दिल्यात, ह भ प मनोहर महाराज डुकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी सेवानिवृत्त झाल्यानंतर हा वर्ग जॉईन केला आणि खरोखर योग आणि प्राणायामाचे फायदे मी स्वतः अनुभवले आणि त्याच बळावर मी याही वर्षापर्यंत अगदी ठणठणनीत आहे, अवचार सर वर्गासाठी जे कार्य करीत आहे ते अविस्मरणीय कार्य आहे त्यांच्या सोबत मी सतत सहकार्य करण्यासाठी तत्पर असतो व राहणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत अवचार यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या महामानवाला वंदन करून आज महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहे व या प्रसंगी या कार्यालयामध्ये आपल्या महानगरातील नगरसेवक नगरसेविका या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्याचा मला मनापासून सार्थ अभिमान आहे त्यांना अनेक कामे असतात रात्री झोपण्यासाठी बारा एक वाजतो आणि सकाळी पाच वाजता उठून मी त्यांना येथे बोलावलं व तेवढ्याच तत्परतेने तेथे उपस्थित झालात त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यालयामध्ये योग वर्गाला काय अडचणी येतात ह्या सर्वांनी अधोरेखित केल्या व अडचणी लक्षात घेता योगाभवन निर्मिती करण्याचे काम सर्वजण तन-मन व धनानी करूया असा संकल्प केला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो व आपल्या ऋणात राहतो. स्वतःसाठी सर्वच जगतात परंतु दुसऱ्यासाठी काहीतरी आपण करावं व अखेरच्या श्वासापर्यंत मी योग आणि प्राणायामाचे माध्यमातून लोकांचे आरोग्य निरोगी निरामय ठेवण्याचा संकल्प करतो. व मंचावरिल पदाधिकारी मनपामध्ये निवडून आले त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी यांनी डॉ.उल्हास मोकळकर यांच्या खांद्याला खांद्या लावून कार्य करावं व आपल्या विभागाचे नाव उज्वल करावे ही अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजकुमार तडस यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमच्या आदर्श योग शिक्षिका जयमालाताई खेळकर यांनी व्यक्त करताना आस्था योग फाउंडेशननी लावलेलं रोपट, त्याचा झालेला वटवृक्ष कधी झाला कळलच नाही या वटवृक्षाच्या मागे अवचार सरांचा सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल त्यांनी शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला, या कार्यक्रमाला मीनाक्षी बेंद्रे, वंदना ढोरे, अर्चना काठोळे, शोभा इंगळे, मनीषा मोरे, जयश्री तडस, चंदना जैन, प्रकाश रणबावरे, विठ्ठल शिंदे, किसन नागे,राजेश नानोटे, चंदू तडस, जोत्स्ना तडस, सुधाकर बावस्कर,नरेंद्र मुळे, घनश्याम खडेकार,तेजराव टाले,मकरंद नानोटी, राजू नकासकर,राजु भाऊ देशमुख,, विनोद लाहोले, संतोष गवई,नानासाहेब सपकाळ,मनोज सरनाईक, वंदना मोरे, कविता अंबडकर, अर्चना काठोळे, गणेश मोरे, श्रीधर मेतकर,मोहन कुऱ्हाडे, राजेंद्र भातुलकर, कविता सरनाईक, सौ चौधरी,वैशाली दातकर,संगीता मोकळकर,उमा आडपाला,रमेश तिवारी, महादेव काठोळे व बहुसंख्या योग साधक साधिका उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी किशोर गावंडे,विनोद देशमुख,उद्धव धाडे, श्रावण फाले,घनश्याम खडेकर यांनी पथक परिश्रम घेतले. सर्वांना राजगिराचा लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र योग शिक्षक संघ व आस्था योग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
