अकोला: दि. १३ऐप्रील २०२६ रोजी राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेच्या माध्यमातून अकोला महानगरामधील मातंग समाज कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अकोला जिल्हधिकारी कार्यालया द्वारे अनुसुचित जाती आरक्षण उपवर्गिकरणा बाबत न्यायमूर्ति अनंत बदर समितीचा अहवाल राज्य शासनाने स्विकारल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले अनुसुचित जातीचे वर्गिकरण अ ब क अशा तीन गटांमध्ये करून जातींची सामाजीक शैक्षणीक नोकरी व आर्थिक स्थितीनुसार विभागणी करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली निवेदनात नमुद करतांना म्हटले की, गेल्या ४० वर्षापासून जातीतील उपेक्षीत व वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या आरक्षण वर्गिकरणाच्या लढ्याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आरक्षण वर्गिकरणा बरोबरच आर्थिक क्षेत्रातही स्वतंत्र धोरण राबविण्याची मत्वपूर्ण मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर मातंग समाजाचे जेष्ठ नेते रामदास तायडे, राष्ट्रीय लहुशक्तीचे राज्य अध्यक्ष मातंग समाजाचे युवा नेते परिमल कांबळे,सुभेदार रमेश खंडारे, सेवानिवृत्त API प्रकाश तायडे,
नागोराव बेलुरकर, बाळासाहेब तायडे, राहुल तायडे, नारायणराव मानतकर,श्रीकृष्ण चव्हाण, गजानन शिंदे, दिलिप वाघमारे,उमेश लखनन, यशोदाबाई गायकवाड, भाऊराव साबळे,पुरुषोत्तम वाघमारे, बाबुराव अवचार,रुपेश घनगांवकर, चरणदास प्रभाकर बोरकर,पत्रकार अवचार घनगांवकर गजानन जोंधळे, मनोहर तायडे, संजय जोहरी, विक्की वाघमारे,अनिल अंभोरे, अर्जून नृपनारायण,योगेश भालेराव,करण भालेराव, किशोर वाघमारे,बाबुलाल खरात, आदिंच्या स्वाक्षरी आहेत
राष्ट्रीय लहु शक्ती च्या वतीने शासनाला निवेदन
