Join WhatsApp group

अकोला जिल्ह्यात मनसेला नवसंजीवनी देणार -मा हेमंतजी गडकरी

अकोट

दि 8/04/2026 बुधवार रोजी अकोट येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा नवनिर्वाचित अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष मा. हेमंतजी गडकरी यांनी मनसे अकोट विधानसभेची आढावा बैठक घेतली.अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष झाल्या नंतर त्यांनी अकोला जिल्ह्याचा दौरा सुरु केला असून त्यांनी पक्षाची नवीन बांधणी सुरु केली असून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता असा अजेंडाच हाती घेतला आहे. अकोट विधानसभा मतदार संघातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांन सह पक्षात नवीन कार्यकर्त्याना संबोधित करत त्यांनी नवीन पक्ष बांधणी तथा सदस्य नोंदणी अभियान राबवन्याला सांगितले 2029 मध्ये मनसेचा विदर्भातील पहिला आमदार हा अकोट मतदार संघातून निवडून आणेल असा ठाम विश्वास त्यांनी पक्षातील सर्व पदाधीकाऱ्यांना दिला. मनसेतील सर्व अंगीकृत संघटना तथा आजी माजी पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे देखील आदेश त्यांनी दिले. अकोट तालुका तथा शहरातील सर्व पदाधिकाऱ्याशी त्यांनी या वेळी संवाद सादत तालुक्यातील सर्व समस्या जाणून घेत सर्व समस्या लवकरच सोडविण्याचे देखील आश्वासन दिले.
कार्यकर्त्यान साठी सदैव तत्पर तथा हजर राहील असेही त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले.
या प्रसंगी मनसे अकोला जिल्हाध्यक्ष राजेश काळे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. श्रीरंग तट्टे, मनसे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष मा संजय पळसकर मनसे अकोट शहर अध्यक्ष शशांक कासवे, शहर सचिव सुरज वर्मा, माजी शहर अध्यक्ष नरेश हिरुळकर, तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम माहोरे,मनसेचे माजी विधानसभा अध्यक्ष निसार भाई शेख.कुशल देव, पवन नेरकर,निखिल कराळे. गणेश वाकोडे, आकाश तसतोडे. कमलेश घेचोरे, अक्षय पंत. शुभम देशपांडे, आदित्य तळोकार, शाकीर खान. किरण इंगळे, अमित चव्हाण,असंख्य पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.बैठकीच्या शेवटी मनसे पक्षात ब्रहदेव ढोणे, नंदकिशोर बंड. सुनील नेमाडे यांनी जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *