डॉ. खुशबू चोपडे यांचा सन्मान स्वागत
अकोला:-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वयंसिद्धा असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्य प्रमुख तथा अध्यक्षा डॉ. खुशबू चोपडे यांचा सन्मान व विशेष स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. सुहासिनीताई धोत्रे , मा. महापौर शारदाताई खेळकर, महानगरपालिका झोनचे सर्व सभापती, नगरसेवक, पदाधिकारी यांनी केले होते.
या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी होत असलेल्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. खुशबू चोपडे यांनी महिलांनी समाजात पुढे येऊन नेतृत्व घ्यावे, स्वावलंबी बनावे आणि समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपली छाप उमटवावी असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी डॉ. खुशबू चोपडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला आणि महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
देशाची व घराची रक्षण करणारी म्हणजे स्त्रीजागतिक महिला दिनानिमित्त
