Join WhatsApp group

संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी
अकोला: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 1फेब्रुवारी 2026 रोजी रेल्वे स्टेशन चौक येथे चर्मकार समाजाच्या वतीने संत रविदास महाराज जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला हारअर्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांनी कशाप्रकारे समतेचा बंधुत्वाचा संदेश प्रबोधन त्यांच्या वाणीतून केले हे आपल्या भाषणातून सांगितले. जयंतीनिमित्त समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजन दानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .
यावेळी चर्मकार समाजाचे नवयुवक संतोष कुरील, खुशाल राजे,दिनेश कुरील, सुरज खेडकर,बबलू देशमुख, कार्तिक जाधव, दीपक जपसरे, सूर्यभान लोढे, रामटेक, पत्रकार शैलेंद्र वानखडे, ज्येष्ठ नेते आबासाहेब शिरसाट व समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *