
अकोला-ऑडिट करिता रेकॉर्ड उपलब्ध न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांवर जि.प सीईओ अनिता मेश्राम यांनी निलंबनाची कारवाई केली.याशिवाय १३ ग्रामसेवकांवर कारवाई अद्याप बाकी आहे.
१५ व्या वित्त आयोगाचे २०२३-२४ या वर्षातील ऑडीट आगर, कासली, शिवापूर-कासोद, वाडेगाव, उरळ बु, शेळद, तामसी, चोहोगांव, आलेगांव, शिर्ला अंधारे, तांदळी बु, पिंपळखुटा, चरणगांव, राहेर, बोडखा या १५ ग्रामपंचायतींनी केले नाही.म्हणून तामसी व शेळद येथील ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत नृपणारायन, व बोडखा ता.पातूर येथील ग्रामपंचायत अधिकारी बी.बी.आढे या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.तर उर्वरित १३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.
