Join WhatsApp group

अनुकंपा भरतीतील 23 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी

Oplus_16777216

अकोला दि. 21 सप्टेंबर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीचा प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आला आहे. अनुकंपा प्रतीक्षा निवड यादीतून 23 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी अकोला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये गट क चे 11 व गट ड चे 12 उमेदवारांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने दि. 17 जुलै च्या शासन निर्णयाप्रमाणे ही तात्पुरती निवड यादी तयार केली आहे.
याकरिता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ प्रशासन अधिकारी भारती देशमुख, वरिष्ठ सहाय्यक श्री. कुलाल यांनी परिश्रम घेतले.
अनुकंपा भरतीतील प्रतिक्षा यादीत असणाऱ्या 23 उमेदवारांना ही तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *