अकोला:-शासकीय विश्रामगृह अकोला येथे बहुजन समाज पार्टी जिल्हा कमिटीची सभा संपन्न
या सभेला प्रमुख व ज्येष्ठ मार्गदर्शक मा. मधुकरराव वानेडकर व व्ही एन तायडे उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनात ही जिल्हा कमिटीची सभा संपन्न झाली
सभेचे आयोजन बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनीष मस्के यांनी केले होते. जिल्हा कमिटीच्या सभेत आवुर्जुन कार्यकर्त्यांना वानडेकर व तायडे यांनी मार्गदर्शन केले व पार्टीत काम करणारे कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांच्याकडे महत्त्वाची जिम्मेदारी सोपविली.
सभेला बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव रामकृष्ण इंगळे, लोकसभा प्रभारी रमेश इंगळे, सैय्यद अजहरउद्दीन, दादेश खांडेकर, रामदास खंडारे चंद्रमणी वाहुरवाघ, बजरंग एललकार, दिनेश खंडारे,विजय सिंग शर्मा, हरीकिशन वानखडे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.जिल्हा कमिटीच्या सभेचे संचालन गायक दयानंद इंगळे व आभार प्रदर्शन अश्विन मानकीकर यांनी केले.
बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कमिटीची सभा संपन्न
