अकोला – स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशातील सर्वच राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ हा अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचला नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या, याबाबत देशभर विविध राज्यांमध्ये अनेक चळवळी,आयोग,न्यायिक खटले सुरु होते, महाराष्ट्र राज्यात सुद्धा लोकनेते मधुकरराव कांबळे साहेब व बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वात आरक्षण उपवर्गीकरण चळवळ मोठया प्रमाणात सुरुवात झाली होती.

त्याचे फलित आता
माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्य खंडपीठाने एक ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार म्हणजेच राज्य शासनाने अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभापासून उपेक्षित, वंचित समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे व भारतीय संविधानाला अपेक्षित असणाऱ्या सामाजिक न्याय आणि समतेची योग्य अंमलबजावणी करावी अशी न्याय मागणी अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या लाभांपासून वंचित असणारे सर्व उपेक्षित समाज घटक मोठ्या प्रमाणामध्ये करीत आहेत.
– अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समर्थन जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढणार.
– मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्देश नुसार न्या.बदर समितीच्या अहवाल इम्पिरिकल डेटाच्या आधारावर, आणि अनु. जातीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती तपासून अनुसूचित जातीचे आरक्षणाची योग्य A-B किंवा A-B-C अशी विभागणी करावी.
-अनुसूचित जातींमध्ये सामाजिक प्रश्नांवर ऐक्य आहे परंतु शैक्षणिक नोकरीविषयक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये प्रचंड विषमता दिसत असल्यामुळे सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे.
– आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातीमध्ये सामाजिक ऐक्य व सलोखा, प्रेम यामध्ये अधिक वाढ होईल.
- पत्रकार परिषदेत व तत्पूर्वी बैठकीत अनुसूचित जातीतील अपेक्षित वंचित समाज घटकातील विविध जातीचे प्रतिनिधी वर्गीकरणाच्या समर्थनार्थ उपस्थित होते.
प्रामुख्याने
रामदास तायडे, परिमल कांबळे,संजय धनाडे, ललित अंभोरे,उमेश लखन, बाळासाहेब तायडे, प्रकाश तायडे, गजानन दांडगे, गजानन शिंदे,बाळकृष्ण गायकवाड, विजय बांगर,डॉ. रामकृष्ण डोंगरे गणेश सपकाळ, प्रभाकर गवई सुरेश गवई अनिल तायडे अविनाश डोंगरदिवे रवि तायडे नागोराव पाटेकर बाळुभाऊ नावकार पिन्टू वानखडे प्रकाश नृपनारायण शनिश्वर अढाऊ गजानन खंडारे शाहीर मधुकर नावकार महादेव राव क्षिरसागर बाळासाहेब तायडे संदिप खंडारे सुनिल खंडारे नारायण मानवतकर सुनिल खंडारे गजानन साठे राहुल अंभोरे संतोष अंभोरे बाबुलाल तायडे प्रफुल्ल साठे गिरधर शेलार दिपक धुरदेव नामदेव धुरदेव संतोष तायडे रवि साठे गणेश गवई उमेश धुरदेव हर्ष ल धुरदेव आकाश सावळे सतिष अढाऊ विशाल अंभोरे प्रकाश घनगांवकर अमर इंगळे अशोक वाघमारे विकास धुरदेव अनुराग धुरदेव पवन चव्हाण लहुससाने विजय साठे रवि गवई गणेश गवई शुभम गवई चेतन धुरदेव अभिषेक धुरदेव शुभम धुरदेव नागोराव वानखडे मोहनराव अंजनकार मधुकर गवई गणेश सपकाळ राजेश अवचार अमोल तायडे प्रभाकर लांडगे संतोष ढगे पंजाबराव वाघमारे रमेश तायडे महादेवराव सदांशिव उमेश लखन गुरु साखान रमेश गोंडाले सुखदेव दाभाडे संतोष खंडारे बाळकृष्ण गायकवाड विजय पारेकर संजय कुचेकर आशा तायडे लता धुरदेव सरिता वानखडे लक्ष्मी कांबळे दुर्गा इंगळे गजानन इंगळे ललीत अंभोरे विजय अंभोरे संजय धनाडे योगेश भालेराव योगेश सोनोने बळीराम नावकार राजेंद्र वाघमारे नंदलाल सावळे संतोष सोनोने विजय बांगर गणेश मानकर गिरीश बांगर ॲड आनंद तायडे ॲड महेश घनगावकर बळीराम नावकार नारायणराव खरात इत्यादी उपेक्षित वंचित समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
