अकोला -महाराष्ट्र राज्य विकसित सतत होत आहे दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या प्रगतीपथाचा प्रत हा वाढता दिसत आहे. मोठमोठे धरण, मोठमोठे रस्ते, रेल्वे, औष्णिक ऊर्जा, परिवहन, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होताना दिसत आहे.
या सर्व बाबतीत राज्य विकसित करण्याकरिता जे शेतकरी प्रकल्पग्रस्त शेत जमीन, घरदार, देऊन राज्य विकसित करण्याकरता सदैव त्या कार्य करत असतात त्या त्या त्यालाच महत्व समजून त्यांना मिळणारा मोबदला व नौकरीचे प्रमाण हे अत्यल्प असून त्याच्या उपाययोजना करण्याकरिता भारतीय जनता पक्षात प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष स्थान असणं आवश्यक आहे
राज्यात जवळपास 25 ते 30 लाख कुटुंब प्रकल्पग्रस्त असून चार लाख प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक आहेत त्या अनुषंगाने आणखी प्रकल्पग्रस्तांचे संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता त्यांच्या सोयी सवलती करता पक्षाच्या वतीने सहकार्य करण्याकरिता भारतीय जनता पक्षात प्रकल्पग्रस्त आघाडी निर्माण करण्याचे आवश्यकता असल्याचे सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते संजय धनाडे यांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे या संबंधात मागणी केली असता माननीय बावनकुळे साहेब यांनी ते मान्य करून पक्षाच्या, प्रकल्पग्रस्तांच्या हिताच्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे म्हटले.
भारतीय जनता पार्टी प्रकल्पग्रस्ता आघाडी निर्माण झाल्यास राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यास भरपूर मदत होईल व त्यांच्या विषयीच्या अडचणी लवकर सुटतील असे प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते व भारतीय जनता पार्टीचे पुर्व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अजा यांनी याप्रसंगी सांगितले..
राज्यात भाजपा प्रकल्पग्रस्त आघाडी ची मागणी…*वरिष्ठ नेता बावनकुळे यांची मान्यता…
