Join WhatsApp group

जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत व्हावे गोपीकिशन बाजोरिया

अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत व्हावे तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश प्राप्त करण्याकरिता तसेच जनसामान्यां च्या समस्या निवारणासाठी शिवसेनेला मजबूत करून पक्ष नेते तथा उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावे असे आवाहन संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केले ते शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी जिल्ह्यात विविध मतदारसंघात दौरे सुरू केले असून त्यांच्या माध्यमातून पक्षामध्ये ग्रामीण भागातील सरपंच माजी सरपंच तसेच इतर पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करीत आहेत रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी शिवसेना उपनेते तथा अकोला जिल्ह्याचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते मुर्तिजापूर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील पदाधिकार्‍यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार विप्लव बाजोरिया , महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख उषा विर्क, रेखाताई राऊत, उपजिल्हाप्रमुख ललित वानखडे, तालुकाप्रमुख सचिन गालट,भिकाजी अवचार, रामकृष्ण डोंगरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजनखेड येथील माजी सरपंच दिनकर दराडे ग्रामपंचायत सदस्य चेतन राठोड डॉक्टर मुसळे संतोष पांडे महेश आंधळे गोपाळ ढोरे चंद्रकांत खंडारे नितीन बरडे साखरविरा येथील कारभारी गोपाल जाधव नायक किसन राठोड माजी सरपंच श्रावण राठोड कळमू झ्याटे ज्ञानेश्वर राठोड पंकज राठोड प्रवीण चव्हाण सुशील चव्हाण गजानन चांदणे इत्यादी पदाधिकार्‍यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *