Join WhatsApp group

शिक्षक दिनाचे निमित्ताने लुंबीनी वन येथे वृक्षारोपन

अकोला – जनहित बहुउद्देशीय संस्था अकोला रजि. नं. ४०/२०२५ च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून लुंबिनी वन निमकर्दा येथे वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसेंदिवस वृक्षांची कत्तल होत असल्याने निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यादृष्टीने हा कार्यक्रम संस्थेच्या वतीने घेण्यात आला.


ह्या वृक्षारोपन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण दौलतराव इंगळे सरपंच सचिन जामोदे, उपसरपंच रमेश इंगळे, माजी पं.स. उपसभापती संजय वाकोडे, माजी पं.स. सदस्य रविभाऊ इंगळे, ॲड. प्रफुल्ल सुरवाडे, विजय इंगळे, करण इंगळे, सुनिल इंगळे, विनोद इंगळे, अनिल इंगळे, दिलीप सोनोने तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असे संस्थेचे सचिव आकाश इंगळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *