Join WhatsApp group

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागात एका वर्षात ५ हजार प्रशिक्षित कार्यकर्ते नियुक्त करणार


— प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांची घोषणा; अमरावती व नागपूर विभागीय आढावा बैठक संपन्न
अकोला : Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विदर्भातील अमरावती व नागपूर विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विभागीय आढावा बैठका आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. आगामी काळात कोकण व दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी या बैठका घेतल्या जात असल्याचे पंडित कांबळे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून येत्या एका वर्षात राज्यभरात ५ हजार नवीन प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्तरावर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे काम विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील राजकारणात पक्षाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी गाव, खेडे, वाड्या-वस्त्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्व उभे करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, माजी आमदार प्रकाश गजभिये, उपाध्यक्ष अरुण धर्माळे, संजय गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष रवीभाऊ खिलारे, प्रदेश संघटक सचिव बाबासाहेब घुमरे, संघटक सचिव डॉ. राजपाल भगत, गजानन भटकर, शामराव वाहूरवाघ, गौतम कांबळे, सुनील वणारे, राजेश फुले, हेमंत देशमुख, दुनिश्वर पेठे, वेद प्रकाश आर्या, शेखर पाटील, बाबुराव येरणे, संजय कोचे, एन्दपाल गेडाम, राकेश श्यामकुवर, देवेंद्र तागडे, प्रमिला रामटेके, राजेश आधाव, नंदकुमार माटे, कोकिळाताई वाहूरवाघ, दीपमाळा खाडे, कुमुद पाचपोर, कुणाल गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *