Join WhatsApp group

शिवसेना अकोला जिल्हा विशेष प्रभारीपदी ललित वानखडे यांची नियुक्ती अकोला : शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव मा. श्री. संजयजी मोरे साहेब यांनी मा. श्री. ललितजी वानखडे यांची शिवसेना अकोला जिल्हा विशेष प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तसेच अकोला जिल्ह्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.या नियुक्तीबद्दल ललितभाऊ वानखडे यांनी पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत अकोला जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी ललितभाऊ वानखडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना शिवसेना जिल्हाप्रमुख मा. चंद्रशेखर पांडे गुरुजी, नगरसेवक मा. मनोज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.अकोला जिल्ह्यात शिवसेना बळकटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती अनिल मालगे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *