अकोला:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुद्ध वंदना घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हरिहर पेठ येथील किल्ल्याचा चौकात मनसे नेते सुरेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांचे उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेश काळे यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोणी एका समाजाचे नसून सर्व मानव जाती करिता त्यांनी प्रयत्न केले व स्त्रियांना अधिकार शिक्षण आंतरजातीय विवाह याबद्दल मार्गदर्शन केले धम्म ध्वज व भगवान गौतम बुद्ध यांचे पूजन करून सर्व नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी जय वानखडे,राजे शिंगळे, रमेश खरात,गणेश आत्राम, सुनील गाडेकर,पिंटू कोमलकर, मंगेश सरदार,दशरथ पहाडे, राष्ट्रपाल गाडेकर,शुभम खरात, मंगला शेगोकार,लक्ष्मी शेगोकार, इत्यादी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी…….
