Join WhatsApp group

लहुजी शक्ती सेनेतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी


मुंबई-नागपूर पदयात्रेतील सहभागींचा सत्कार; अकोली जहागीर येथे भव्य रॅली


अकोला (दि. ११ एप्रिल) : अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मुंबई ते नागपूर दरम्यान अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) मागणीसाठी आयोजित पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येऊन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


कार्यक्रमाची सुरुवात भव्य रॅलीने झाली. रॅलीनंतर वैष्णवी मंगल कार्यालय येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.


सत्कारमूर्तींमध्ये लहू श्री विष्णू भाऊ कसबे (संस्थापक अध्यक्ष, लहुजी शक्ती सेना), श्री कैलास दादा खंदारे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), श्री नितीन भाऊ दोडके, श्री नितीन भाऊ वायदंडे, श्री शंकर भाऊ तायडे, श्री अनिकेत हजारे, श्री अनिल भाऊ कांबळे, श्री तोताराव गोमस्कर, श्री राहुल भाऊ पाटोळे, श्री आबासाहेब सरोदे, श्री किरण भाऊ थोरात, श्री शुभम भाऊ खडसे, श्री मधुकर रावजी देवारे, श्री हेमंत भाऊ दाभाडे, श्री श्रीनिवास पोल, रमिषभाई सय्यद, श्री गणेश भाऊ ताटे, श्री अविनाश भाऊ बनसोडे, श्री दत्ताभाऊ धडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल भाऊ गायकवाड होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री विष्णू भाऊ शेलारकर (पश्चिम विदर्भ महासचिव, लहुजी शक्ती सेना) यांनी भूमिका पार पाडली.
प्रमुख उपस्थितींमध्ये डॉ. रुपेश भाऊ खडसे (विदर्भ अध्यक्ष), डॉ. रमेश भाऊ चंदनशिव (पश्चिम विदर्भ अध्यक्ष), श्री विलास भाऊ निकाळजे, श्री सुनील भाऊ दळवी (राज्य कार्यकारिणी सदस्य), तसेच श्री पंकज भाऊ जाधव (अमरावती जिल्हाध्यक्ष), श्री मोहनराज दुतोंडे (वाशिम जिल्हाध्यक्ष), श्री सुरज अंजनकर (अकोला जिल्हाध्यक्ष), सौ. विमलताई चव्हाण (महिला वाशिम जिल्हाध्यक्ष), श्री सदानंद बांगर (अकोला जिल्हा सचिव), सौ. सरिता ताई पोटफोडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन श्री अविनाश भाऊ अंभोरे, श्री चंद्रशेखर गायकवाड, श्री राहुल तायडे, श्री राहुल घनगाव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री ऋतिक बोरकर, राजेश मोरे, गजानन गवई, किशोर अंभोरे, सागर नाटेकर, कविताताई गायकवाड, सौ. दुर्गाताई गायकवाड, सौ. संध्या ताई अंभोरे, सौ. भाग्यश्री ताई गवई, सरुबाई सदानशीव, पुष्पाताई गायकवाड, रवी भाऊ गवई, शुभम भाऊ गवई आदींचा सक्रिय सहभाग लाभला.
या कार्यक्रमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर व सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *