अकोला : जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्याने आता निर्णायक टप्पा गाठला असून, संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागाचे खाते प्रमुख थेट रडारवर आले आहेत. तक्रारी दडपणे, शासन आदेशांना बगल देणे आणि बोगस कागदपत्रांना संरक्षण देणे या गंभीर आरोपांमुळे शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.
तक्रारी ‘गायब’… संगनमताचा संशय तीव्र
बदली यादी प्रसिद्ध होताच शिक्षकांनी केलेल्या तक्रारी रहस्यमयरीत्या गायब झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या तक्रारी वरिष्ठांपर्यंत जाऊ नयेत म्हणूनच त्या दडपण्यात आल्याचा आरोप असून, यात शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
शासन आदेशांना उघडपणे ‘ठेंगा’
संवर्ग १ मधील शिक्षकांची फिजिकल तपासणी अनिवार्य असतानाही ती जाणीवपूर्वक टाळण्यात आली. शासनाच्या स्पष्ट निर्देशांची पायमल्ली करून बदली प्रक्रिया रेटल्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बनावट कागदपत्रांचा ‘खुला खेळ’
गंभीर आजाराच्या नावाखाली बनावट प्रमाणपत्रे सादर करून बदली मिळविण्याचा प्रकार उघड झाला आहे. मात्र, याकडे डोळेझाक केल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.
संवर्ग २ मध्येही मोठा घोळ
पती-पत्नी अंतराच्या निकषात चुकीची माहिती देऊन बदली मिळविल्याचे आरोप आहेत. संबंधित प्रमाणपत्रांची शहानिशा न केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
तक्रारदारांचा पाठपुरावा; राजकीय दबाव वाढला
या संपूर्ण प्रकरणात तक्रारदार गणेश कुरई यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रकरण अधिकच तापले आहे. यासोबतच आमदार हरीश पिंपळे यांनी हा विषय लावून धरल्यामुळे
यामुळे आता या प्रकरणात कोणतीही तडजोड शक्य नसून,
शिक्षण अधिकाऱ्यांचे निलंबन शंभर टक्के होणारच, अशी ठाम चर्चा प्रशासन वर्तुळात सुरू झाली आहे.
चौकशी की फक्त दिखावा ?
प्रस्तावित चौकशी ही केवळ औपचारिकता ठरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, आरोपांची गंभीरता लक्षात घेता थेट निलंबनाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.
‘मोठा आर्थिक खेळ’ उघड होणार ?
तक्रारी दडपणे आणि नियमांना हरताळ फासणे यामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराचा वास येत असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळेच संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का, असा थेट आरोप होत आहे.
जनतेचा एकच सवाल — कारवाई कधी ?
जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा पूर्णपणे डागाळली असून, आता सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीकडे आहे —
“शिक्षण अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कधी होते?”
बदली प्रक्रियेत निष्काळजीपणा की संगनमत? जबाबदार अधिकाऱ्यावर निलंबनाचे संकट
Oplus_16777216
