अकोला प्रतिनिधी :
महाराष्ट्रात योग चळवळीला नवसंजीवनी देणारा मोठा निर्णय समोर आला असून महाराष्ट्र योग शिक्षक संघाने आपल्या संघटनात्मक बांधणीला अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

अमरावती विभागप्रमुखपदी डॉ. चंद्रकांत अवचार यांची निवड करण्यात आली असून

अकोला जिल्हाध्यक्षपदी डॉ. उल्हास मोकळकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या असून राज्य मार्गदर्शक मंडळ सदस्य म्हणून सुभाष तायडे यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रक्रियेत डॉ. कृणाल महाजन व प्रसाद कुलकर्णी यांचेही मोलाचे योगदान लाभल्याचे सांगण्यात आले.
योग क्षेत्रात नवी ऊर्जा!
नियुक्तीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—
“योग ही फक्त साधना नसून निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक घरापर्यंत योग पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता असेल!”
आरोग्यदायी महाराष्ट्राकडे वाटचाल
या दमदार नियुक्त्यांमुळे अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागात योग चळवळीला नवे बळ मिळणार असून, समाजात आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे.
एकूणच, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या या “खतरनाक” निर्णयामुळे योग क्षेत्रात मोठी चळवळ उभी राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत!
