अकोला जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून बार्शीटाकळी व मुर्तीजापुर येथे रुजू
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दि. २८ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार गट-ब (राजपत्रित) संवर्गातील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी-१०) अंतर्गत स्वतंत्र कार्यभार देण्याचा निर्णय अमलात आला आहे.
राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०२२ च्या अंतिम निकालावरून निवड झालेल्या आणि प्रशिक्षणासाठी रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासोबत स्वतंत्र पदस्थापना देण्यात आली आहे. या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नियुक्त ठिकाणी हजर राहून कार्यभार स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील नियुक्त्यांनुसार बार्शीटाकळी येथे

श्रीनिवास पाटील यांनी

तर मुर्तीजापुर येथे आशिष राठोड यांनी आपापला कार्यभार स्वीकारला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होत कामकाज सुरू केले असून विभागीय स्तरावर त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रशिक्षण कालावधीत वेळोवेळी वनामती, नागपूर व यशदा, पुणे यांच्या सूचनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. तसेच आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सदर निर्णयामुळे जिल्हास्तरावर प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे
