Join WhatsApp group

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्याची मागणी


अकोला – युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीस मान्यता दिली असून TAIT 2025 चा निकालही जाहीर झाला आहे. मात्र, बिंदुनामावली तपासणी, प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती तयार करणे व इतर प्रशासकीय प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.
युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले की, हजारो पात्र उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असून त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ बिंदुनामावली तपासणी पूर्ण करून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी अमोल इंगळे, नागसेन गवई, पवन बंड, राहुल बोदले व इतर युवकांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी प्रशासनाने विलंब न करता योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *