
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जि.अकोला या टिमचे साहसी कार्य

▶️ *यवतमाळ जिल्ह्य़ातील तालुका दारव्हा पोलीसांनाकडून मीळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी अंदाजे 10:00 वाजताच्या सुमारास दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावालगत असलेल्या तलावात एक ईसम बुडाल्याची माहीती मिळताच स्थानिक पातळीवर तरनोळी आणी चिखली गावातील नागरीक यांनी काल पासुन शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही शेवटी यवतमाळ येथील शोध मोहीम पथकास पाचारण करण्यात आले होते सकाळ पासून शोध घेतला असता यांना सुद्धा काहीच मिळुन आले नाही तलावात अंदर दरी आणी खोल पाणी असल्यानेच शोध मोहीमेस अडथडळे निर्माण होत होते. *शेवटी दारव्हा पोलीस ठाण्याचे पिएसआय निलेश तारक सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांना आज 4 मार्च रोजी दुपारी माहिती देऊन तात्काळ पाचारण केले तेव्हा लगेच जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी विष्णु केवट,अश्विन केवट,शेखर केवट,हर्षल वानखडे, यश जवके,यांना शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी पाठविले* तीथे पोहचताच ट्रेस केले असता तलावाचे मध्यभागी 20 ते 25 फुट खोल पाणी असल्याचे समजले लगेच सर्च ऑपरेशन चालु केले असता अवघ्या 10 मिनिटातच तलावातील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलीसांचे ताब्यात दिला. यावेळी मृतक इसम हा गजानन सकरु राठोड अं.वय (40) वर्ष रा.चिखली ता.दारव्हा जि.यवतमाळ येथील असल्याचे निष्पन्न झाले.. घटनास्थळावर उपस्थित दारव्हा पोलीस ठाण्याचे एपिआय शिवप्रकाश मुळे सर,यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय.निलेश तारक सर,पो.शि.विजय पारधी साहेब,हो.सै.सवाई आणि इंगोले यांनी परीश्रम घेतले. घटनास्थळावर पोलीस पाटील तसेच सरपंच,यांचेसह चिखली गावातील मा.सरपंच खुपराम चव्हाण तसेच नागरीक व नातेवाईक हजर होते.यावेळी तरनोळी आणी चिखली येथील नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणी तत्परतेचे कौतुक केले अशी माहीती पो.शी.विजय पारधी यांनी दिली.
