Join WhatsApp group

अखेर बाळापूर व पातूर पंचायत समितींना कायमस्वरूपी गटविकास अधिकारी;

Oplus_16777216

अकोला, दि. 29 जून 2026 : जिल्हा परिषद अकोला अंतर्गत दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पंचायत समिती बाळापूर आणि पंचायत समिती पातूर येथील गटविकास अधिकारी पदांवर अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग येथे अमोल पडवळ वश्री. दीपक सवडे यांची गटविकास अधिकारी, पंचायत समिती बाळापूर तर श्री. प्रदीप गुजर यांची गटविकास अधिकारी, पंचायत समिती पातूर म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे दोन्ही पंचायत समित्यांमधील प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून, प्रलंबित विकासकामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, गटविकास अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे अनेक प्रशासकीय निर्णय आणि विकासकामांवर परिणाम होत होता. आता नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावरील प्रशासन अधिक सक्षम होणार आहे.
जिल्हा परिषद अकोला तसेच बाळापूर आणि पातूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून, नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांकडून ग्रामीण विकासाच्या कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *