Join WhatsApp group

सरपंच-उपसरपंच मेळावा व अकोट पंचायत समितीची वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न


अकोट : पंचायत समिती अकोट अंतर्गत सरपंच-उपसरपंच मेळावा तसेच वार्षिक आमसभा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या आमसभेला अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.


कार्यक्रमाची सुरुवात संत संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अकोट तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच विविध विभागांतील कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी रमाकांत माळी यांनी केले. आमसभेसाठी तहसीलदार सुनिल चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी राजेश खुमकर तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


विविध विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाचा सविस्तर आढावा सादर केला. त्यानंतर सरपंच व नागरिकांनी आपल्या समस्या व लेखी निवेदने मांडली. अनेक समस्यांचे निराकरण तत्काळ सभेमध्येच करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सावरकर यांनी केले
. कार्यक्रमाचे नियोजन विस्तार अधिकारी (पं) मदनसिंग बहुरे, श्रीमती दिपाली महल्ले व कृषी विस्तार अधिकारी प्रमोद महल्ले यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहायक गटविकास अधिकारी राजेश खुमकर यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच माजी गटविकास अधिकारी कालीदास तापी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

एकूणच, ही आमसभा प्रशासन व जनतेमधील संवादाचा प्रभावी मंच ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *