Join WhatsApp group

बार्शीटाकळी पंचायत समितीत ‘मनमानी’ कारभार? – जानोरकर प्रकरणामुळे शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह

Oplus_16777216


बार्शीटाकळी (प्रतिनिधी) – पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत शिक्षण विभागात सध्या एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरखेड येथील शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रमोद जानोरकर यांच्याकडे अधिकृत केंद्रप्रमुख असतानाही “विस्तार अधिकारी”चा प्रभार देण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
नियमाप्रमाणे केंद्रप्रमुखांकडेच असा प्रभार देणे अपेक्षित असताना, तो डावलून एका शिक्षकाला हा चार्ज देण्यात आल्याने “नेमकं कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला?” असा थेट सवाल शिक्षकवर्ग आणि गावकरी उपस्थित करत आहेत.
यामुळे वरखेड शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार समोर येत आहे. शिक्षकाचा मुख्य कार्यभाग अध्यापन असताना, त्याला प्रशासकीय जबाबदारी देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
. अनेक शिक्षक या प्रकारामुळे त्रस्त असून भीतीपोटी उघडपणे बोलण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, “अकोला प्राथमिक शिक्षणाधिकारी” यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन जानोरकर यांचा अतिरिक्त प्रभार तात्काळ काढून त्यांना मूळ शाळेत अध्यापनासाठी पाठवावे, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात शिक्षक आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
शिक्षण विभागातील हा मनमानी कारभार थांबवून दोषींवर कठोर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार?
याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *