अकोला : वै. गुरुवर्य श्री वासुदेवजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आई तुळजाभवानी मंदिर, शिवसेना वसाहत, राजे शिवाजी चौक येथे दिनांक 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान श्रीमद् भागवत कथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या भागवत कथेसाठी प्रवक्ते म्हणून ह.भ.प. लक्ष्मण महाराज आनंदे यांचे संगीतमय सादरीकरण होणार आहे. भागवत ग्रंथ पूजन श्री दिलीपराव देशमुख व सौ. कविताताई दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडणार असून, सप्ताहाचे यजमान म्हणून संतोष बुरडे व सौ. संगीता संतोष बुरडे कार्यभार सांभाळणार आहेत.
या सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. यात हरीश महाराज खंडारे (चिंचोली), अरुण महाराज सावंत (मेहकर), कु. कृष्णाली ताई गावंडे (अकोला), उमाशंकर महाराज आर्य (मोठी उमरी), दिनेश महाराज डोईफोडे (दारापूर), रविंद्र महाराज खेडेकर (खामगाव), श्रीकृष्ण महाराज सावळे (राष्ट्रीय कीर्तनकार, अकोला), श्रीकृष्ण महाराज भातुरकर (जिगाव टाकळी), राजेंद्र महाराज वक्ते (पाळोदी) आदींचा समावेश आहे.
तसेच संतोष महाराज भालेराव (लाठी) यांचा भारुडाचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. वाद्यवृंदात विनेकरी नेमाने महाराज यांचा संच, गायक इंद्रजीत महाराज गाडगे, भूषण महाराज उमाळे, तबलावादक अनंत सरोदे व ऑर्गन वादक लोकेश अवचार हे सहभागी होणार आहेत.
या धार्मिक सप्ताहाचा समारोप शनिवार, दिनांक 4 एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीने होणार असून, सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेत संतोष महाराज भालेराव यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
श्री आई तुळजाभवानी महिला भजन मंडळातर्फे सर्व भाविक भक्तांना श्रीमद् भागवत श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रमोद पांडे यांनी दिली आहे.
शिवाजी चौक येथे 26 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान श्रीमद् भागवत कथा सोहळा
