choose
📰
प्रतिनिधी |
विठ्ठल नामाचा अखंड गजर, भक्तीचा उत्साह आणि माउलीच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन यावर्षी २७ व्या वर्षी पंढरपूर वारीसाठी वारकरी भक्तांचा उत्साही समूह रवाना झाला. सलग २७ वर्षांची ही अखंड परंपरा श्रद्धा, समर्पण आणि विठ्ठलभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
“ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “राम कृष्ण हरी” या नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले. ह्यावारी मध्ये उल्हास मोकळकर, ज्ञानबा पुंड,अनंत लव्हाळे, राजेंद्र भोंबळे,सुनील बोनगीनवार,अमोल घायवट,विनोद आगळे,महादेव इंगोले,रामेश्वर अतकर,अनिल नालिंदे,शंकर गायगोळे,ज्ञानेश्वर बिरकड,
वासुदेव गावंडे,किशोर बर्डे,पुरुषोत्तम अडोळकर,शिवाजी चतरकर, योगेश बोदळे,रुपेश हाडोळे, गजानन मोहोड,शाम मोरे,राजू काळे, योगेश इंगळे हे वारकरी सहभागी आहेत.
प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते.
वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून समता, सेवा, शिस्त, प्रेम आणि अध्यात्माचा जीवनमंत्र आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे ही परंपरा जपणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे समाजातून कौतुक होत असून, नव्या पिढीसमोर त्यांनी भक्ती आणि संस्कारांचा आदर्श ठेवला आहे.
यंदाही सर्व वारकरी सुरक्षित प्रवास करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन सुखरूप परतावेत, अशी प्रार्थना सर्वांनी व्यक्त केली.
“वारी म्हणजे चालणारा धर्म,
नाम म्हणजे जगण्याचा श्वास,
विठ्ठल म्हणजे भक्तीचा विश्वास!”
जय हरी विठ्ठल!
ज्ञानोबा-तुकाराम!
