Join WhatsApp group

अकोला : हिंदू दलित संघाची महत्त्वपूर्ण बैठक १० एप्रिलला


अकोला – हिंदू दलित संघटनेची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण या ज्वलंत विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून, बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते मा. संजय भाऊ धनाडे भूषविणार आहेत.
या बैठकीस हिंदू दलित समाजातील समाजसेवक, व्यावसायिक, अधिकारी, साहित्यिक तसेच महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी संजय भाऊ धनाडे, परिमल दादा कांबळे, ॲड. राजेश प्रधान, उमेश भाऊ लखन, बाळासाहेब गायकवाड, किशोर भाऊ काकडे, डॉ. डोंगरे, गजानन भटकर, गवई पाटील, गजानन मसने, प्रा. मारोती उंबरकर सर, पवन गणेश इंगोले, भागवत पवार, प्रकाशजी तायडे, जयदेवराव इंगळे, नानाभाऊ सदाशिव, बाळासाहेब मांडवे, अरुण खिराळकर, पुरुषोत्तम वाघमारे, जयभाऊ इंगोले, प्रभाकर बांगर, रामदास तायडे, वीरेंद्र ढोके, गजानन विरेकर आणि पवन पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
या बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात ठोस भूमिका मांडली जाणार असल्याने सर्व संबंधितांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *