Join WhatsApp group

मोफत लाठी-काठी स्वसंरक्षण प्रशिक्षणा चे आयोजन

मोफत लाठी-काठी स्वसंरक्षण प्रशिक्षणा महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशनचा उपक्रम
अकोला: आजच्या बदलत्या आणि वेगवान जीवनशैलीत स्वसंरक्षण ही केवळ एक कला नसून अत्यावश्यक जीवनकौशल्य बनली आहे. वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिला, मुली आणि विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज ठरत आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लाठी-काठी (सिलंबम) स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शारदा समाज मंदिर, TWC जिमच्या बाजूला, मराठा नगर येथे दररोज सायंकाळी ६:३० ते ७:३० या वेळेत दि. ५ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन राज्य प्रमुख डॉ. खुशबू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, मुख्य मास्टर ट्रेनर सिहान अरुण सारवान व तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणाद्वारे सहभागींच्या आत्मविश्वासात वाढ होऊन शारीरिक ताकद, मानसिक धैर्य आणि संकटकाळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होईल. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“स्वसंरक्षण शिका – सुरक्षित जीवन जगा!” असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. खुशबू चोपडे (राज्य प्रमुख) यांच्याशी मो. 9325564839 / 9359648409 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *