अकोला : शहीद दिन व जागतिक पाणी दिनाच्या निमित्ताने श्रीहरी सेवा भवन, बाळापूर रोड, अकोला येथे विशेष नागरी सेवा शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते हर्षल इंगळे व सौ. दीपमाला दोरकर यांनी केले होते.

कार्यक्रमाचे नियोजन सौ. रेखा इंगळे, श्रीकृष्ण दोरकर, सतीश सपकाळ, रामकृष्ण इंगळे, अभिजीत वाघमारे, गोपाल बसरे, निलेश बाळापुरकर, आनंद घरडे, सचिन इंगळे, अमोल उमक, जयमाला खेडकर, श्रीकृष्ण अलोट व हरिदास ताथुरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला येथील न्यायाधीश तथा सचिव मा. श्री. दि.श. दाभाडे यांच्या हस्ते शहीद व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लोकअभिरक्षक श्री. उंबरकर, ॲड. देवानंद गवई, अधीक्षक प्रशांत बलिंगे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी राजेश डहाके, ज्येष्ठ पत्रकार मनीष खर्चे, तसेच डॉ. किशोर रत्नपारखी, डॉ. संदीप बिटोडे, डॉ. राजेश काटे व माजी सैनिक गजानन वानरे उपस्थित होते.
सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मा. न्यायाधीश दाभाडे यांनी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. जागतिक जल दिनानिमित्त ॲड. देवानंद गवई यांनी उपस्थितांकडून जलसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
शिबिरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. विधी स्वयंसेवकांनी गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा 1994 संदर्भातील माहितीपत्रके वितरित केली. तसेच एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड तयार करून देण्यात आले. राशन विभागामार्फत दुय्यम राशन कार्ड मोफत तयार करण्यात आले. नेत्र तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणीसह औषधांचे वितरणही करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात डॉ. राजेश टाले, अक्षय कांबळे, डॉ. प्रणय जानबंधु, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. स्मिता शिरसाट, डॉ. रूपाली पुंडे, डॉ. श्रद्धा मोरे, डॉ. शिवपाल किल्लेवार, डॉ. स्वप्निल डोंगरे, डॉ. अक्षय दुबे व ब्रदर गोपाल पवार यांनी वैद्यकीय सेवा दिली. सत्यसाई ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी भजनी मंडळाच्या वतीने सुंदर गीत सादर करण्यात आले. गायक कलावंत गणेश इंगळे, मोहन हिवराळे, रामा परकाडे, गोपाल घाटे व विजय वानखडे यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन देवानंद अंभोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षल इंगळे यांनी केले.
एकंदरीत, सामाजिक जाणीवा व सेवा यांचा संगम घडवणारे हे शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
