Join WhatsApp group

प्रकल्पग्रस्तांच्या 15 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये, – मंत्री मकरंद पाटील.


मुंबई – मुंबई मंत्रालय येथील मान्य पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या दालना विविध प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज प्रकल्पग्रस्त यांच्या नोकरीवर्षी धोरण अमलात आणण्याकरता प्रदीर्घ चर्चा झाली त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची वाढती लोक संख्या पाहता पाच टक्के होऊन पंधरा टक्के करण्याचा निर्णय हा येणारा मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार. असे आजच्या बैठकीत मकरंद आबा पाटील यांनी सुतुवाच्य केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना च्या माध्यमातून अध्यक्ष संजय धनाडे यांच्या नेतृत्व राज्यातील बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेमध्ये वाढती संख्या पाहता पाच टक्के करण्यात बाबत शासनाकडे मागणी करत होते त्याच अनुषंगाने आज मुंबई मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत मंत्री मकरंद आबा पाटील यांनी ठोस निर्णय घेऊन त्यामध्ये ठेवणार असल्याचे बोलले याचबरोबर एमपीएससी मध्ये प्रकल्पग्रस्तांना राजपत्रित अधिकारी गट अ पासून तत्कापर्यंत प्रकल्पग्रस्तांना स्थान देण्यात बाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला. आत्महत्या झालेल्या प्रकल्पग्रस्तांना दहा लाख रुपये त्यांच्या नोकरी, व
राज्यातील विभागांतर्गत गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्याच प्रकल्पात भरती प्रक्रिया 50 टक्के आरक्षण देण्यात संबंधी शासनाकडे पाठवण्यासंबंधी निर्देश देण्यात आले तसेच बोगस प्रकल्पग्रस्तांसंबंधी यासाठी निवड एसआयटी नेमून कारवाई करण्यात येणार तसेच सरळ खरेदी धारकांना प्रमाणपत्र वितरित करणार असल्याचे निर्णय घेण्यात आला या व्यतिरिक्त मा संजय धनाडे यांनी केलेल्या मागणीला दुजोरा देत स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या नावाने त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात स्वर्गीय अजितदादा पवार प्रकल्पग्रस्त भवन ची निर्मिती करण्यात असल्याचे माननीय मंत्रिमंहोदत यांनी मान्य केले.
बृहन्मुंबई क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये राज्यातील प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला त्यामुळे गेल्या भरतीचे राज्यातील बाहेरील प्रकल्पग्रस्तांनी अर्ज केले होते हे आता ग्राह्य ठरणार आहेत.
यावेळी सर्व सरळ खरेदी धारकांना प्रमाणपत्र चर्चा करण्यात आली तसेच पेंढी प्रकल्प व आदिवासी प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबल्यात जमीन देण्याचे पडताळून पाहण्यात येणार आहे.
याप्रसंगी अमरावती आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा सचिव, पुनर्वसन सहसचिव, कक्ष अधिकारी, कर्मचारी, सामान्य प्रशासनाचे उपसचिव, जलसंपदाचे अधिकारी,
बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे, शुभम धोंदलकर, पियुष देशमुख, युवा प्रकल्पग्रस्ताचे ठकाजी बाचकर, शाम सिसोदिया, बळीराजा संघटनेचे मनोज चव्हाण व पदाधिकारी आधी उपस्थित होते
आजच्या बैठकी मुळे राज्यातील प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *