Join WhatsApp group

उद्या बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात मंत्रालयात बैठक..


अकोला -राज्यात अडीच कोटी प्रकल्पग्रस्त कुटुंबाची संख्या झाली असून बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या ही पाच लाखाच्या घरात असताना सुद्धा प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याकरिता स्पष्ट धोरण शासनाचे नाही.
सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना व महाराष्ट्रातील अन्य संघटनांनी या संबंधात तीव्र आवाज उठवला असून त्याचे दखल घेत राज्याचे पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांच्या दालनात सोमवार दिनांक 20 जुलै 2016 रोजी दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन केलेले आहे. या बैठकीत बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आरक्षण तसेच एमपीएससी मध्ये प्रकल्पग्रस्त समाविष्ट करणे, तसेच वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या ना एक रकमे देऊन त्यांचे प्रमाणपत्र जमा करणे, ज्या प्रकल्पात जमीन समाविष्ट झाली त्या विभागात 50 टक्के आरक्षण, आणि प्रकल्पग्रस्तांच्या अन्य मुद्द्यांवर सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात राज्यातील प्रकल्पग्रस्त बेरोजगार उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये मंत्रालयातील सर्व सचिव अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *